बीड जिल्ह्यात आठ महिन्यात ११३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर कर्जमुक्तीची घोषणा केली मात्र तरीही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यात बीड जिल्ह्यातील ११३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ५४ आत्महत्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या तर २५ आत्महत्या अपात्र ठरवल्या गेल्या. यातील ३४ प्रकरणे प्रलंबीत ठेवण्यात आले. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होतात. मराठवाड्यात आठ महिन्यात ४७६ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवलेले आहे. 
कर्जबाजारी, नापिकी आणि शेतीमालाला नसणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. केेंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक चक्रव्यूहात सापडत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्येचा आकडा मराठवाड्यातील आहे त्यातच बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून समोर आलेले आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील ११३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ५४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या तर २५ प्रकरणे अपात्र ठरवले गेले. ३४ प्रकरणे प्रलंबीत आहेत. मराठवाड्यात ४७६ शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. महाआघाडी सरकारने कर्जमुक्तीची घोषणा करूनही शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे. 
मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची आकडेवारी
जिल्हा             संख्या    पात्र     अपात्र    प्रलंबीत
औरंगाबाद        ६४    ४४    २०    ००
जालना             ५२    ४७    २०    ०३
परभणी             ३६    १५    १३    ०८
हिंगोली             ३४    २०    ०६    ०८
नांदेड             ५४    ४०    ०६    ०८
बीड            ११३    ५४    २५    ३४
लातूर            ३७    ३६    ०१    ११
उस्मानाबाद        ८६    १८    ५८    १०


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like