गढीच्या जयभवानी मंदिरात चोरी

eReporter Web Team

गढीच्या जयभवानी मंदिरात चोरी
देवीचा टोप, कमरपट्टा, सोन्याचे दागिणे चोरीला, चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथक दाखल
गढी (रिपोर्टर): मंदिरामध्ये कोणी नसल्याचा फायदा उचलून मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आतील जय भवानी देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, कमरपट्टा आणि गळ्यातील मणीमंगळसूत्र इत्यादी ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. आज सकाळी पुजार्‍यास चोरीचा प्रकार दिसून आला असता याची माहिती गेवराई पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथक, एलसीबी, फिंगरप्रिट पथक दाखल झाले होते. 

गेवराई तालुक्यातील गढी येथे जय भवानी मंदिर आहे. या मंदिरामध्ये रात्री कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातील जयभवानी देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, चांदीचा कमरपट्टा, सोन्याचे मणीमंगळसूत्र असा ऐवज चोरून नेला. आज सकाळी पुजार्‍यास चोरीचा प्रकार दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती गेवराई पोलीसांना दिली, त्यानुसार पोलीस निरीक्षक चोंभे, एपीआय तडवी, उबाळे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी एलसीबी, श्‍वान पथक, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. या चोरीच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान मंदिरात दानपेटी होती, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती माजी आ.अमरसिंह पंडित यांना झाल्यानंतर त्यांनी सकाळी मंदिरात जावून पाहणी केली.


अधिक माहिती: gadhi

Related Posts you may like