बेपत्ता तरुणाचा शोध लावावा; जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील पिसेगाव येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता झालेला आहे, त्याचा अद्यापही तपास लागला नाही. कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आलेला नाही. सदरील तरूणाचा शोध लावण्यात यावा अशी मागणी तरुणाच्या घरच्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
विकास बालासाहेब नेहरकर (वय २५) हा ८-९-२०१९ रोजी पिसेगाव येथील चाटे यांच्या मालकीच्या विटभट्टीवरून स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.१४ सीएक्स ७८१६ घेवून गेला तो अद्याप परत आलेला नाही. सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन केज येथे मिसींग दाखल केलेली आहे. सदरील या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. या तरुणाचा पोलीस प्रशासनाने शोध लावावा अशी मागणी बालासाहेब आण्णा नेहरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like