जिल्हा रुग्णालय फुल्ल विठाई हॉस्पिटल अधिग्रहीत

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  बाधितांवर उपचार करण्यासाठी आता बेड कमी पडू लागल्याने जिल्हा आरोग्य विभागाने शहरातील विठाई हॉस्पिटल अधिग्रहीत केले आहे दुसरीकडे जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून आज १०२ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 
   बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय झाल्यामुळे बेड फुल्ल झाले आहेत. रुग्णालयामध्ये बाधितांना जागा नसल्याने आता आरोग्य विभागाने बीड शहरातील विठाई हॉस्पिटल अधिग्रहीत केले आहे. सदरचे हॉस्पिटल हे सुसज्ज असून ५० बेडची तयार यंत्रणा या ठिकाणी आधिच उपब्ध आहे. त्यामुळे काहीसा दिलासा शहरवासियांना मिळत आहे. डॉ. लहाने यांचे विठाई हॉस्पिटलअंतर्गत आता कोविड रुग्णांना उपचार मिळणार आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत. दुसरीकडे आज १०२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like