बीडहून औरंगाबादकडे जाणारा लाखोंचा गुटखा पकडला

eReporter Web Team

गोंदी पोलिसांची शहागड जवळ कारवाई, गुटख्यासह ट्रक जप्त
शहागड (रिपोर्टर)- ट्रकमध्ये गुटखा जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी गहिनीनाथ नगर जवळ सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात ३४ लाख रुपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. सदरील हा गुटखा बीडहून औरंगाबादकडे जात होता. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
   मराठवाडयामध्ये गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बीडमधून ट्रक (क्र. के.ए. ५६-५४१३) यामध्ये औरंगाबादकडे गुटखा जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना झाल्यानंतर सकाळी आठ वाजता पोलिसांनी शहागड जवळील राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील गहिनीनाथ नगर येथे सापळा रचला. ट्रक आल्यानंतर तो थांबवून त्याची झाडाझडती घेतली. या ट्रकमध्ये २०४ गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. यामध्ये गोवा नामक गुटखा आहे. हा गुटखा ३४ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय अधिकारी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार भास्कर आहेर, पो.कॉ. खराद, गिरी यांनी केली. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्यासह ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like