मारहाण प्रकरणातील ८ जणांवर ३०७ नुसार गुन्हा दाखल 

eReporter Web Team

आरोपीच्या शोधासाठी दोन पथकांची नियुक्ती 
केज (रिपोर्टर)- अंत्यसंस्काराला निघालेल्या चौघा जणांवर काही गावगुंडांनी हल्ला करत त्यांना गंभीररित्या मारहाण केल्याची घटना परवा रात्री होळ जवळ घडली. या प्रकरणी आठ जणांविरोधात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात ३०७ नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आले आहेत. 
   निजामोद्दीन काझी, बाबू तांबोळी, असलम आत्तार, लायक मुल्ला हे चौघे जण परवा रात्री धारूरहून अंबाजोगाईला अंत्यविधीसाठी जात होते. होळ जवळ या चौघांना काही गावगुंडांनी मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी निजामोद्दीन यांच्या फिर्यादीवरून आठ आरोपींविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीीक हर्ष पोद्दार यांनी भेटही दिली होती. या प्रकरणाती आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय झोटे हे करत आहेत. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like