दोन दिवसात बीडमध्ये जनता कर्फ्यू? कोरोना रोखण्यासाठी व्यापार्‍यांनी पुढाकार घ्यावा

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बीड शहरात मोठ्या प्रमाणावर होत असून रोज जिल्ह्यात शेकडोंवर रुग्ण आढळून येत आहेत तर बीड शहरातही रोजची संख्या मोठठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू हा पर्याय महत्वाचा आहे. त्याबाबत आज जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील उद्योग-व्यवसायिक-व्यापार्‍यांची बैठक घेऊन याबाबत चर्चा केली. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात बीडमध्ये जनता कर्फ्यू लागू शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी आता व्यापार्‍यांनीच पुढाकार घ्यावा, असा सूर शासन-प्रशासन व्यवस्थेतून निघत आहे. 
   आज सकाळी अकरा वाजता शहरातील व्यवसायिक, उद्योजक, व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. जनता कर्फ्यूबाबत व्यापार्‍यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी, सूचना ऐकून घेतल्या. जिल्हाधिकार्‍यांनीही व्यापार्‍यांना परिस्थितीची इत्यंभूत माहिती देत चर्चा केली. या चर्चेतून येत्या दोन दिवसात शहरात जनता कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे.


अधिक माहिती: beed online reporter

Related Posts you may like