आष्टीत कंडक्टरचे घर फोडले

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- आष्टी शहरातील संभाजीनगर भागात राहणारे राज्य परिवहन मंडळातील वाहक संदीप जायभाये यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रात्री घडली. या प्रकरणी आष्टी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
   शहरातील संभाजीनगर भागात संदीप महालिंदग जायभाये (वाहक, राज्य परिवहन महामंडळ आष्टी) यांचे राहते घर आहे. २० सप्टेंबरच्या रात्री १२ ते ४ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाट उघडून लॉकरमधील सोन्याचे गंठण, कानातील झुंबर, सोन्याचे वेल, सोन्याचे बाजीगर, एक नथ, चांदीचे पैजन, रोख नऊ हजार असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला म्हणून अज्ञात चोरट्यांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like