
बाहेर राहून पत्रकबाजी करणार्यांनो आठ तास पीपीई किट घालून लोकांची सेवा करून बघा
बीड (रिपोर्टर)- कोरोनासारख्या गंभीर आजारातून मुक्त झाल्याचे समाधान व्यक्त करत कोविड रुग्णालयात आठ-आठ तास पीपीई किट घालून कर्तव्य बजावणार्या डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांमुळेच आपण कोरोनावर मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांनी दिली. बाहेर बसून कोविड रुग्णालयाबाबत, डॉक्टरांबाबत विरोधात पत्रकबाजी करण्यापेक्षा आठ तास पीपीई किट घालून लोकांची सेवा करा मग लक्षात येते, परिस्थिती काय आहे. मी चौदा दिवस कोरोना वॉर्डात उपचार घेत होतो. बीड जिल्ह्यातील कोविड रुग्णालय आणि तेथे कर्तव्य बजावरे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे इमाने इतबारे काम करत असून त्यांच्यामुळेच कोरोना बाधीत लोकांचे जीव वाचत असल्याचेही अंबुरे यांनी म्हटले.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांना गेल्या पंधरवाड्यात कोरोनाची लागण झाली होती. ते बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचाही त्रास सुरू झाला होता. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. रेवडकर, डॉ. धूत, डॉ. टाक यांच्यासह अन्य डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांच्या प्रयत्नांमुळे आपण कोरोनावर मात करू शकलो, असे म्हणत अंबुरे यांनी बीड जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा शल्यचिकित्सक हेही कोविडची परिस्थिती अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत असल्याचे सांगून कोविड रुग्णालयात बाथरुमच्या घाणीबाबत ओरड होते त्याबाबत रुग्णांनी आपले घर समजून सर्वकाही व्यवस्थीत केले तर तेही होणार नाही. कोविड रुग्णालयाबाबत बाहेर राहून पत्रकबाजी करणार्यांनाही अंबुरे यांनी चिमटे काढले. ते म्हणाले की, आठ तास पीपीई किट घालून लोकांची सेवा करा, मग लक्षात येते. बीड जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात व्यवस्थीत उपचार होतात. डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांमुळेच लोकांचे जीव वाचतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मी कोरोनावर मात करू शकलो, असेही बाळासाहेब अंबुरे यांनी म्हटले.
अधिक माहिती: online beed reporter