सरपंचाच्या अविश्‍वासाला ग्रामसभेची अट रद्द

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)ः-भाजप सरकारच्या काळामध्ये सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आलेल्या आहेत. मात्र विहीत कालावधीनंतर या सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्‍वास आणला तर हा अविश्‍वास ठराव विशेष ग्रामसभा लावून तो पारीत करण्याची अट होती. मात्र एकदा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर अविश्‍वास आणला तर तो ग्राह्य धरण्यात यावा. त्याला लावलेली ग्रामसभेची अट ग्रामविकास विभागाने रद्द केलेली आहे.
ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवाने १६ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना या आदेशाची प्रत पाठविले असून मागच्या सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जनतेतून थेट निवडलेल्या सरपंचावर काही ठिकाणी अविश्‍वास आणलेले आहे. मात्र या सरपंचावर विशेष ग्रामसभेची बैठक लावून तो अविश्‍वास पारीत करावा अशी अट होती. मात्र २३ मार्च पासून राज्यात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन लागली असल्यामुळे ग्रामसभेची आयोजन करण्यात आलेेले नाही. त्यामुळे सरपंचावर अविश्‍वास आणलेल्या ग्रामपंचायतीचे कारभार ढेपाळलेले होते. याबाबत राज्यातून राज्याच्या ग्रामविकास व निवडणुक विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होत. त्यानुसार १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक काढून सरपंचाच्या अविश्‍वाससाठी लावण्यात आलेली ग्रामसभेची अट रद्द  केलेली आहे. 
 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like