
बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग
रात्रंदिवस मेहनत घेत असताना कोरोना मात्र मागे हटायला तयार नाही. रोज
शेकडो बाधितांची भर पडत असल्याने पॉझिटिव्हचा आकडा वाढतच आहे. आज दुपारी
दोन वाजता आरोग्य विभागाला ११५२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये
१४६ जण पॉझिटिव्ह तर १००६ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह
आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ३२, आष्टी तालुक्यातील ११, बीड
तालुक्यातील ३०, धारूर १०, गेवराई १३, केज १४, माजलगाव ११, परळी ९,
पाटोदा ६, शिरूर ७ तर वडवणी तालुक्यातील ४ पॉझिटिव्ह रूग्णांचा समावेश
आहे.
अधिक माहिती: online beed reporter