धनगर बांधवांच्या ढोल बजाओने जिल्हा दणाणला

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- धनगर आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या संघटना आंदोलन करत आहेत. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाभरामध्ये ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी आंदोलन झाले असून जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थित होते. 

गेवराई तहसिल कार्यालयासमोर ढोल बजावो

गेवराई  धनगर समाजाला आरक्षण पासून वंचित ठेवणार्‍या सरकारला जागे करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी राज्यभरात  ढोल बजाव, सरकार जगावो आंदोलन होत असून याच पार्श्वभूमीवर गेवराई तहसील कार्यालय व ग्रामीण भागात आप आपल्या गावात ग्रामपंचायत स्थरावर ढोल बजावो, सरकार जगावो आंदोलन करण्यात
आले. यामधील मागण्या धनगर समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गाचा दाखल देणे, एसटी प्रवर्गासाठी न्यायालयात चालू असलेल्या याचिकेच्या सरकारकडून तज्ञ वकिलाची नियुक्ती करणे, ही याचिका जलदगती कोर्टात चालवावी,मागच्या सरकार ने मजूर केलेले १००० कोटी रुपये धनगर समाजावर खर्च करावेत अश्या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर गेवराई तहसील कार्यालयासमोर आज धनगर समाज बांधवांच्या वतीने घोषणाबाजी करत ढोल वाजवून हे आंदोलन करत निवेदन देण्यात आले. यावेळी किशोर कोकरे,राहुल काकडे, दत्ताभाऊ पिसाळ,गजानन काळे,अशोक काकडे,राजेश शेजूळ,माधव बेदरे,राधेश्याम दातार,मुकेश महाजन,शुभम देवदयाल,अशोक वलेकर,नितीन पिसाळ यांच्यासह आदी समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी या मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

माजलगावात विविध संघटनांची तहसीलसमोर निदर्शने
माजलगाव -    धनगड ही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नसून धनगर ही जात अस्तित्वात आहे. शब्दाच्या जंजाळ समाजाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून धनगड असणारी जमात धनगर आहे.त्यामुळे या शब्दाची दुरुस्ती करून एसटी आरक्षणाची महाराष्ट्र सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यानुषंगाने माजलगाव तहसील समोर धनगर साम्राज्य सेना, मल्हार सेना,धनगर आरक्षण कृती समितीच्या ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष देवकते,विलास नेमाने, अविनाश कांडूरे,रामेश्वर गवळी, यांच्यासह ज्ञानेश्वर सरवदे, अशोक डोने, कल्याण कसपटे, किसन वगरे, अर्जुन कुंडकर भगवान शंकर सुशीला मंजुळदास फुंडकर विजय धायगुडे गणेश सातपुते आप्पासाहेब तायडे, नारायण भले, इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शिरसेवाड यांना देण्यात आले.

वडवणी तहसिलवर सरकार जगाओ आंदोलन 
        वडवणी   धनगर समाज संघर्ष समिती व वडवणी तालुका आरक्षण कृती समिती यांच्यावतीने वडवणी तहसील समोर आंदोलन करण्यात आले.यावेळी बद्रिनाथ व्हरकटे,महादेव सातपुते,आकाश परबळे,अनंत काळे,लहु गवळी,बलवंत गायकवाड,नवनाथ तुरे,दिलीप चोरमले,ज्ञानोबा परबळे,बिरुदेव चौरे,नामदेव सातपुते,मनोज परबळे,बबन वंजीर,किरण लोकरे,प्रकाश वंजीर,पांडुरंग चौरे,बंडू वंजीर,कारभारी गायकवाड,शिवम लोकरे,अर्जुन गायकवाड,सुरेश गायकवाड यांच्यासह धनगर समाज बांधव सहभागी झाला होता.  


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like