शिवसंग्रामने ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांच्या न्यायासाठी लढा उभा केला

eReporter Web Team

उद्या मांजरसुंभा येथे आ विनायक मेटेंच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थितीत रहा - बबनराव माने
बीड(प्रतिनिधी):- शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटनेकडून गेल्या काही वर्षांपासून ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्या प्रश्नावर न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. याबाबत या संघटनेकडून न्याय मागण्यांसाठी विविध ठिकाणी मेळावे, आंदोलने, बैठका घेण्यात आले आहेत. उद्या दि 28 सप्टेंबर 2020 वार सोमवार रोजी मांजरसुंभा ता बीड येथे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांच्या न्याय मागण्यांसंदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी केले आहे.
    शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड मजुर,वाहतुकदार आणि मुकादम यांना माथाडी कायदा लागु करा. लवाद कालबाह्य झालेला आहे, लवाद ऐवजी ऊसतोड कामगारांचे प्रश्न ज्या मंत्री महोदयाकडे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली मुकादम, कामगार, साखर संचालक व कारखाना प्रतिनिधी घेऊन 11 लोकांची समिती नेमावी, त्यांनी निर्णय घ्यावेत, कमिशन,आरोग्य, भाव त्यांनी ठरविले पाहिजेत, समिती कडून योग्य न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी हा प्रश्न सोडवून द्यावा. ऊसतोडणी व वाहतुक करार हा कारखाना व मुकादम यांच्यामध्ये करण्यात यावा. ऊसतोडणी मुकादम यांचा एकूण खर्च पाहता सध्याचे 18.50 % इतके कमिशन अत्यंत तुटपुंजे आहे, म्हणुन मुकादम यांचे कमिशन किमान 30 % करावे. साखर कारखाना व शासन यांनी ऊसतोड कामगार, मुकादम,वाहतुकदार यांचा 1 वर्षा करिता 10 लाख रूपये चा किमान विमा काढावा तसेच बैलांचा विमा किमान विमा 1 लाख रूपये काढावा. साखर कारखाना यांनी ऊसतोड कामगारांना मुकादमा मार्फत उचल देण्यात यावी, बँकेमार्फत मुकादमाची शेत जमीन गहाण टाकुन कर्ज देण्यात येवु नये. साखर कारखाना प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी आणि शासनाच्या प्रतिनिधी एकत्र येवुन करारनामा करताना बैलगाडी आणि ऊसतोडणी व ट्रॅक्टर, ट्रक वाहतुक यांना किमान 150 % (टक्के) दराची वाढ करण्यात यावी. साखर कारखान्यास कामागारांना घेवुन जाणार्‍या व घेवुन येणार्‍या बैलजोडीस प्रत्येकी 15 हजार रूपये प्रति ट्रॅक्टर, 25 हजार प्रति ट्रक यास 40 हजार रूपये अनुदान कारखान्याने देण्यात यावे.         यासोबतच कारखानावर ऊसतोड कामगार, वाहतुकदार,मुकादम व त्यांचे कुटूंबिय गेल्यावर आणि ते वापस येईपर्यंतची त्यांचया आरोग्याची जबाबदारी कारखान्यांनी उचलावी, ज्यामध्ये आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास त्यांच्या दवाखान्याचा सर्व खर्च आणि त्या कालावधी मध्ये त्यांचे होणारे नुकसान भरून देण्याची जबाबदारी कारखान्यानी घ्यावी. साखर कारखान्यांनी सर्व मजुर,वाहतुकदार व मुकादम यांच्या करिता फिरते रूग्णवाहिका, रूग्णालयाची सोय करावी. करारनामा प्रमाणे मजुराचे,मुकादमाचे आणि वाहतुकदाराचे पैसे कारखानदारांनी त्वरीत द्यावेत. पैसे देण्यास उशीर झाल्यास त्यांना व्याजाप्रमाणे पैसे देण्यात यावेत. कारखान्यांनी सर्व मजुर त्यांचे कुटुंबिय, वाहतुकदार यांना मोफत राहण्याची जागा,  या प्रश्नांवर लक्ष घालुन सन्मानजनक तोडगा काढावा, या मागण्यांसाठी शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार मुकादम व वाहतुकदार संघटनेने घोषित केलेला संप सुरूच राहिल. असे जाहीर करण्यात आले आहे. यास्तव  मांजरसुंभा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी केले आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like