सहा महिन्यानंतर संस्था चालका  -विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- संस्था चालक आणि बडतर्फ मुख्याध्यापिका यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद विवाद सुरू होता. या प्रकरणी विनयभंगाची तक्रार मुख्याध्यापिकेने शिवाजीनगर पोलिसांकडे दिली होती. ही तक्रार 20 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती. सहा महिन्यानंतर रात्री संस्था चालकासह सचिवाविरोधात 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शिवनेरी प्राथमिक विद्यालयामध्ये कार्यरत असणार्‍या मुख्याध्यापिकेस काही महिन्यांपूर्वी निलंबीत करण्यात आले होते. या निलंबणाच्या विरोधात सदरील मुख्याध्यापिका न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला होता. यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती.  संस्था चालक व सचिवांनी आपणास शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार मुख्याध्यापिकेने 20 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती. तेव्हापासून संस्था चालक आणि मुख्याध्यापिका यांच्यात वादविवाद सुरू होते. काल रात्री या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोहन सिरसट व विवेक सिरसट यांच्या विरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like