पोहनेर येथील गोदावरी नदीला पूर

eReporter Web Team

परळी (रिपोर्टर)- परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    गेल्या काही दिवसापासुन मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे तारवण,माजलगाव ढालेगाव अदी प्रकल्प भरली आहेत.तारवण तलावाचे 17 दरवाजे,माजलगावचे 3 दरवाजे व ढालेगाव प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे गोदावरी नदी दोतोंडी वाहत असल्यामुळे परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
शनिवारी वरील प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे पोहनेर येथील गोदावरीला पुर आल्याने पुलाला पाणी लागले आहे.प्रशासनाकडुन महसुल इरिकेशन,पोलीस व गावातील नागरिक मिळुन सतर्कतेसाठी पथक तयार करण्यात आले आहे. पोहनेर, डिग्रस, तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांनी सतर्क राहुन प्रशासनाच्या वतिने देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर येथील उपनदी असलेली सरस्वती नदीला बकच पाणी शिरल्यामुळे परिसरातील शेतीच प्रचंड नुकसान झाले असल्याचे पोहनेरचे सरपंच नितिन काकडे यांनी सांगितले


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like