स्थानिक गुन्हे शाखेने 550  दारुच्या बाटल्या पकडल्या 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- दारुची अवैध विक्री करण्यासाठी स्कुटीमध्ये दारू घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्कुटीसह दोन इसमांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून देशी दारूच्या 550 बाटल्या ताब्यात घेतल्या. ही कारवाई काल बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. 
   दारूची अवैध विक्री करण्यासाठी अशोक प्रकाश लोकरे (रा. काळा हनुमान ठाणा, पेठ बीड) व अनिल मधुकर तांगडे (रा. शिंदेनगर बीड) हे दोघे एका स्कुटीवर अवैध देशी दारू घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून देशी दारूच्या 550 बाटल्या (किंमत 14300) व स्कूटी ताब्यात घेऊन त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई  वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गु. शा. चे पोलिस निरीक्षक भारत राऊत, सपोनि. विजय गोसावी, श्रीमंत उबाळे, हनुमंत खेडकर, युनुस बागवान, तांदळे यांनी केली. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like