आज 932 निगेटिव्ह बीड, अंबाजोगाईत सर्वाधिक बाधित

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर) कोरोनाना फास आवळला असून रोज पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या
मोठया प्रमाणात येत आहे. मात्र आज आरोग्य विभागाला 1078 संशयितांचे स्वॅब
प्राप्त झाले असून यामध्ये तब्बल 932 जण निगेटिव्ह आले तर 146 जण
पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसापासून 200 च्या जवळपास
पॉझिटिव्ह आढळून येत होते. मात्र हा आकडा 150 च्याही कमी आला आहे.
आज जिल्हाभरातील पाठवलेल्या 1087 संशयितांपैकी सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड
तालुक्यात असून ते 31 आहेत. त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 29 जण
बाधित आढळून आले तर आष्टीत 12, धारूरमध्ये 3, गेवराई 12, केज 18, माजलगाव
16, परळी 10, पाटोदा 7, शिरूर 7 व वडवणी तालुक्यात 9 रूग्णाचा समावेश
आहे.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like