ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर  ‘सिटू’ ने अडवला

eReporter Web Team

ऊसतोड कामगार आंदोलन तीव्र होणार
बीड (रिपोर्टर)-  बीड - ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर रात्री बीड येथे आडवून ऊसतोड कामगार, मुकादम यांना हात जोडून विनंती केली व मुकादमास घरी जाण्यास सांगितले, मुकादमांनी विनंती मान्य केली, आणि जो पर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कोणीही कारखान्याला जाऊ नये असे आव्हान सीटू ऊसतोड कामगार संघटनेचे मोहन जाधव यांनी यावेळी केले आहे.
    ऊसतोड कामगारांचा तोडणी दर चारशे रुपये झाला पाहिजे, मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ, वाहतूक दरात वाढ, विमा, आरोग्य आणि ऊसतोड कामगारांसाठी माथाडी बोर्ड च्या धर्तीवर कायदा करण्यात यावा. कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करून सगळ्या सोयी सुविधा ऊसतोड कामगारांना देण्यात यावे, पाच वर्षांचा करार तीन वर्षाचा करावा, यासाठी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. तरी जोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऊसतोड कामगारांनी आपले घर सोडू नये असेही आवाहन यावेळी करण्यात आले. तुम्ही गाड्या भरू नका हा लढा तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण कारखान्यावर जाऊ नये, असे जाहीर आव्हान   ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, दत्ता प्रभाळे, यांनी केले आहे. प्रसंगी उमेश तुळवे, ऋषिकेश वाघमारे, ड गणेश मस्के, आशिष माने इत्यादी होते.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like