ती बुलेट कोणाची?

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये गेल्या तीन दिवसांपासून एक बेवारस बुलेट उभी आहे. या बुलेटकडे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांचे लक्ष गेले. त्यांनी ही बुलेट कोणाची आहे? असा प्रश्‍न पोलिस प्रशासनाला विचारल्यानंतर पोलिसांनी आज सकाळी सदरील बुलेट ताब्यात घेतली आहे. 
    एम.एच.१६-२१२२ या क्रमांकाची सिलव्हर रंगाची नवीन बुलेट गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी आहे. या बुलेटकडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे लक्ष गेले. त्यांनी या बुलेटबाबत पोलिस प्रशासनाला प्रश्‍न विचारत ‘ही बुलेट कोणाची आहे?’ असे विचारल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी येऊन बुलेट ताब्यात घेतली. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like