मेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्‍यांच्या सीओ गुट्टेंना सूचना

eReporter Web Team

बीड  बीड शहरातील रस्त्याची कामे दोन्ही क्षीरसागरांकडून अडवली जात आहेत. एक क्षीरसागर रस्ता काम सुरु करायला भलता उशीर करतात तर दुसरे कसेबसे सुरु झालेल्या रस्त्याला जाणीवपूर्वक अडवण्याचे काम करत आहेत. यामुळे बीडकरांचे हाल होत असून महिनोनमहिना रस्ते खोदून ठेवण्यात येत आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाणी साचत असल्याने लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. डेंग्यू अन मलेरियाचे शेकडो पेशंट कोरोनासोबत वेगवेगळ्या दवाखान्यात पाहायला मिळत आहेत. अपघातांमध्ये जखमी होण्याचे प्रमाण तर शेकडोंमध्ये आहे.  दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:३० वाजता जिल्हाधिकारी कार्याकायात जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ श्री विनायक मेटे यांनी बीडच्या जनतेला अर्धवट रस्ता कामांमुळे होणार्‍या त्रासाबाबत माहिती दिली. यावेळी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना जिल्हाधिकारी यांनी शहरातील रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यात यावीत तसेच जो कुणी चालू कामे जाणीवपूर्वक थांबवण्याचे काम करेल त्यांच्यावर कलम ३५३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले आहेत.
         बीड शहरातील नागरिकांनी संवादादरम्यान आ विनायक मेटे यांच्याकडे आपली कैफीयत मांडत होणार्‍या त्रासाबाबत आपले गार्हाणे मांडले होते. नगरपालिकेच्या आणि स्थानिक आमदाराच्या वाट्यामुळे शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः या  चुलत्या - पुतण्यांनी वाट लागली आहे. ठिकठिकाणच्या कामाच्या देवघेवमुळे त्यांच्यातील होणारे वाद हे काम लांबणीवर पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका क्षीरसागराला 

अतिवृष्टीत सापडलेल्या
पिकांची नुकसानभरपाई द्यावी 
 अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई आवश्यक असून पिकविम्यासाठीची प्रक्रिया तात्काळ राबवावी अशी मागणी आ श्री विनायक मेटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. सोबतच बीड तालुक्यातील शेतकर्‍यांना  गेल्या ८ दिवसांपासून पीककर्जासाठी आवश्यक असणारा फेरफार उतारा मिळत नाही. याबाबत शिवसंग्रामकडे तक्रारी येत आहेत, पीककर्जासाठी शेवटची तारीख २ दिवसांवर आलेली असताना आतातरी फेरफार मिळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून देताच पर्यायी कक्ष तात्काळ सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.दाम मिळाले कि काम सुरु होते मात्र दुसर्‍याला हिस्सा मिळाला नाही कि काम बंद होते. या क्षीरसागरांच्या देवघेवीमुळे शहरातील बहुतांश कामे बंद पाडली गेली आहेत. त्यामुळे बीड शहरातील गोरगरीब जनता मात्र यात भरडली जात असल्याचे आ विनायक मेटे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी नियमानुसार कामे व्हायला हवीत, दिरंगाई होऊ नये असे सांगत जो कुणी या रस्त्यांना जाणीवपूर्वक अडवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर तात्काळ कलम ३५३ नुसार कारवाई करावी, शहरातील कामे तात्काळ सुरु करा असे आदेश मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना दिले गेले आहेत. यावेळी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ श्री विनायक मेटे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे आदींची उपस्थिती होती.  


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like