अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील जवळपास चौदाशे लाभार्थ्यांना कर्ज वाटप--- नरेंद्र पाटील

eReporter Web Team

 

बीड, दि. १:-ऑनलाईन रिपोर्टर 

-राज्य शासनाच्या वतीने कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत गरजू तरुणांसाठी योजना राबविली असून याद्वारे आत्तापर्यंत जिल्ह्यातील जवळपास चौदाशे लाभार्थ्यांना ६० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले

महामंडाळाच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी श्री नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बैठक झाली .यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , महामंडळाचे अधिकारी श्री अमित मालेगावकर, महामंडळाचे संचालक राजेंद्र म्हस्के , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील म्हणाले राज्यात महामंडळाच्या वतीने जवळपास 17000 तरुणांना व गरजू लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे यातून एक हजार सातशे कोटी रुपयांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत नुकतीच बैठक होऊन मराठा समाजातील गरजू ना लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली आहे

ते म्हणाले , केंद्र व राज्य शासन विविध राष्ट्रीयीकृत सहकारी बँकांमध्ये शासनाचा विविध विभागांचा निधी जमा करीत असते . यामुळे बँकांनी शासन समाजातील विविध घटकांसाठी राबवित असलेल्या धोरणाशी सुसंगत भूमिका घ्यावी . शासन विविध समाज घटकांच्या विकासासाठी कर्ज योजना राबविताना त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जाव्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे कर्ज योजना गरजू लाभार्थ्यांना पर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यक्ष म्हणून मी स्वतः राज्यातील सर्व जिल्ह्यात भेटी देऊन प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बँका अधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेतल्या आहेत यामुळे बँकांनी सक्षमतेने कार्यवाही करून लाभ पोहोचवावा असे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील म्हणाले

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली

यावेळी उपस्थित जिल्ह्यातील बँक व्यवस्थापक विविध विभागांचे अधिकारी आणि समन्वयक यांनी जिल्ह्यातील विविध कर्ज प्रकरणे त्यातील अडचणी व कार्यवाहीची माहिती दिली .

* जिल्ह्यातील केतुरा येथे नरेंद्र पाटील यांची भेट, पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज जिल्ह्यातील केतुरा येथे भेट देऊन आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या तरुणाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. श्री नरेंद्र पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर आले असून या भेटीनंतर बोलताना त्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like