पीक नुकसानीबाबत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - आ.पवार

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपासून वादळ वार्‍यासह सुरु असलेल्या परतीच्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. यात शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या याबाबाबत गेवराई तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट पीक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी दिला. 
पीक नुकसानीसह विविध प्रलंबित प्रश्नाबाबत आ.लक्ष्मण पवार यांनी आज तहसिल कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
  या बैठकीला आ.लक्ष्मण पवार यांच्यासह तहसीलदार सचिन खाडे, ना.तहसीलदार रामदासी,प्रशांत जाधवर,गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप,कृषी अधिकारी सोनवणे, शेतकरी पुत्रचे डॉ.उद्धव घोडके,शेतकरी नेते नानासाहेब पवार, माजी उपनगराध्य दादासाहेब गिरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत आ.पवार यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीबाबत मंडळाधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकरी यांच्याकडून माहिती घेत संबंधित अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा असे अवाहन केले. दरम्यान तालुक्यातील रस्ता व जुन्या पुलाबाबत ही माहिती घेऊन याबाबत  लवकरच निर्णय घेऊन संबंधित पूल व रस्त्यासाठी प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच पूर परिस्थिती बाबत ही नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केली. तर ज्या त्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांची कामे तात्काळ मार्गी लावावेत. यावेळी राशन वाटपाच्या काही तक्रारींही त्यांनी समोरासमोर मार्गी लावल्या. या बैठकीला तलाठी,मंडळाधिकारी व कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like