
माजलगाव (रिपोर्टर)-शहरातील ज्वलंत मागण्या संदर्भात हजोरो वेळा लेखी तोंडी तक्रारी करुनही कामे होत नसल्याने या आंदोलनात कामे न झाल्यास व रस्ते , नालीपुल आणि विद्युत पोल मुळे अनुचित प्रकार केवळ न प चे दुर्लक्ष असल्याने घडत आहेत त्या नगर परिषद प्रशासनावर गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी आज दि १२ रोजी जिल्हा परिषद नंबर १ शाळेमागे लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने नालीच्या खड्यावर आंदोलन केले
शहरातील भिमनगर कडून आझाद नगर कडे जाणार्या रस्त्यावर राजश्री साळवे यांच्या घराजवळ आणि मस्जीत समोर व वार्डात आवश्यक त्या ठिकाणी नालीवरील पुलचे काम व स्लॅप त्वरीत चालु करा .आयुष्मान भारत योजनेच्या कार्डाचे ढिग नगर पालीकेत पडून असुन कर्मचरन्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये एकही कार्ड वाटप झालेले नसुन नगर सेवकांनी देखील यात राजकारण केलेले असून या कार्डाचे वितरण चालू करा .जिल्हा परिषद नंबर १ शाळा मागील रस्ता पुर्णतहा खचलेला असून पिण्याचे पाणी सुटल्यास या ठिकाणी नागरीकांना गुढगाभर पाण्यातुन ये जा करावे लागते .तसेच रोडवरच विद्युत पोल असल्याने आणि अंधारातून रस्त्यावर चालताना अनेक जनावरे दगावले असून यात आता नागरीकांची जिवीत हानी होण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणुन हा पोल सारुन हे रस्ता नाला व पुल तात्काळ करण्यात यावा या साठी . हे आंदोलन करण्यात येत असून शहरातील मूलभूत सुविधा कडे व नागरिकांच्या आरोग्य कडे नगर पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याने आज दि १२ रोजी सकाळी ११ वा हे बेमुदत उपोषण करत असल्याचे लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी म्हंटले आहे या वेळी आड अल्ताफ पठाण व शेख शमशेर हे ही उपस्थित होत.
अधिक माहिती: beed reporter