गेवराईत भाजपच्या वतीने चिंतेश्वर मंदिरासमोर आंदोलन

eReporter Web Team

दार उघड उद्धवा दार उघड म्हणत टाळ, मृदंगच्या गजर

गेवराई (रिपोर्टर)

कोरोना प्रादुर्भाव च्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल,मास, मदिरा सर्वकाही चालू केले आहे. त्यातच आता हॉटेल व बिअर बार सुरू करण्यात आले आहेत. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिरे मात्र सध्या बंद आहेत. तसेच राज्यातही सामाजिक अंतर व नियम अटीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरू करण्यात व भजन किर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी वारंवार करूनही आघाडी सरकार भक्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. या मागणीच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपच्या वतीने मंदिरासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात येत असून गेवराई येथील चिंतेश्वर मंदिरासमोर ही भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास फलके,दीपक सुरवसे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब गिरी,नगरसेवक राहुल खंडागळे अजित कानगुडे,युवा नेते करण जाधव,प्रल्हाद येळापुरे, भाजप विस्तारक ईश्वर पवार, नगरसेवक भरत गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, समाधान मस्के, नगरसेवक किशोरजी धोंडकर, संजय इंगळे, अमोल मस्के, राम पवार, महेश सौंदरमल, सतीश पवार, नितीन शेटे, मुन्ना मोटे,मोहन राखुंडे, कैलास पवार यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान सकाळपासून टाळ,मृदंगच्या तालावर भजन करत प्रशासनाला निवेदन दिले.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like