गढीच्या बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेतकर्‍यांच्यी क्रूर चेष्टा

eReporter Web Team

कागदपत्रांची पुर्तता करून फॉर्म घेतले मात्र अद्यापही पीक कर्ज वाटप केले नाही
जिल्हाधिकार्‍यांसह आ.लक्ष्मण पवार यांनी लक्ष देण्याची गरज

गेवराई (रिपोर्टर):- गेल्या पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांनी यावर्षी सुरूवातीलाच चांगला पाऊस पडला. त्यामुळे उसनवारी करून महागामोलाचे बि-बियाणे खरेदी केले. आज ना उद्या पीक कर्ज मिळेल त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून बँकेत हेलपाटे मारतात. बँक मॅनेजरपासून कर्मचारी जो-जो कागद सांगेल तो-तो कागद त्या फाईलला चिटकून दिले. पहाटे पाच वाजल्यापासून बँक बंद होईपर्यंत बँकेच्या दारात शेतकरी उपाशी पोटी थांबले. मात्र अद्यापही गेवराई तालुक्यातील गढीच्या बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेकडेा शेतकर्‍यांना पीक कर्ज दिले नाही. शेतात जे पीकलं होतं ते घरात येण्याअगोदरच परतीच्या पावसाने वाया गेलं आहे. बि-बियाणासाठी खासगी सावकाराकडून घेतलेले कर्जाचा बोजा ही वाढत आहे. त्यामुळे शेतकरी नैराश्यात गेला असून तात्काळ पीक कर्ज द्यावे अशी मागणी येथील शेतकर्‍यातून होत आहे. निर्गगठ्ठ झालेल्या या बँकेतील कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी आणि आ.लक्ष्मण पवार सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.
गेल्या पाच वर्षापासून पाऊस नव्हता. यावर्षी सुुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजा खुष झाला. मात्र बि-बियाणासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने शेतकर्‍यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पीक कर्जासाठी अर्ज केले. मात्र वेळेवर पीक कर्ज न मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांनी सावकाराकडून कर्ज घेवून महागामोलाचे बि-बियाणे खरेदी केले. वेळेवर चांगला पाऊस पडल्याने पीकही जोमात आली. मात्र हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हेरावून घेतला. यात शेतकर्‍यांच्या प्रचंड नुकसान झाले. दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जुन महिन्यात शेतकर्‍यांकडून घेतलेले अर्ज अद्यापही मंजूर केले नाही. अनेक शेतकर्‍यांनी दोन-दोन महिने बँकेच्या दारात हेलपाटे मारले. पहाटे ५ वाजल्यापासून बँक बंद होईपर्यंत ते उपाशी पोटी बँकेच्या दारात उभे होते. शेतातलं काम बाजूला सोडुन ते पीक कर्ज मिळावं म्हणून कागदपत्राची जमवाजमवी केली. विनाकारण गढीच्या महाराष्ट्र बँकेने अनेक शेतकर्‍यांना कागदपत्राच्या त्रुटी आहेत म्हणून फाईल परत पाठवल्या. त्या सर्व कागदपत्राची पुन्हा शेतकर्‍याने पुर्तता करून बँकेत अर्ज दाखल केले आहेत. मात्र तरी देखील निर्गगठ्ठ झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकर्‍यांच्या खात्यात पीक कर्ज टाकले नाही. त्यामुळे शेतातलंही गेलं आणि  सावकाराच्या कर्जाचा बोजा ही वाढतोय यामुळे शेतकरी नैराश्यात गेला असून तात्काळ त्याला पीक कर्ज देणे गरजेचे आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like