कोरोना कहर सुरूच

eReporter Web Team

केवळ ६४७ संशयितांमध्ये आढळले १२१ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर):- गेल्या आठवड्यात कोरोनाला ब्रेक लागला होता. ५० ते ७० च्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येते होते. कालपासून पुन्हा कोरोनाने मुसंडी मारली असून आज आरोग्य विभागाला केवळ ६४७ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये तब्बल १२१ जण बाधित आढळून आले आहेत तर जिल्ह्यात डेथ रेटही वाढत आहे. 
आरोग्य विभागाला आज दुपारी सव्वा बारा वाजता ६४७ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून या अहवालामध्ये ५२६ जण निगेटीव्ह आले असून १२१ बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई १०, आष्टी १४, बीड ४०, धारूर १२, गेवराई ८, केज ४, माजलगाव १०, परळी २, पाटोदा ८, शिरूर १०  व वडवणी ३ पॉजिटिव्ह रूग्णणांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात रूग्ण संख्या कमी होती. या आठवड्यात कमी संशयितांचे अहवाल प्राप्त होत असून त्या तुलनेत जास्त पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेवून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्स पाळावे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like