ऊसतोड कामगारांना घेऊन जाणार्‍या  अनेक गाड्या ‘सीटू’ने परत पाठविल्या

eReporter Web Team

बीड  (रिपोर्टर)- ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करा, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा या मागणी साठी सीटू ऊसतोडणी कामगार संघटने सह अनेक ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे, परंतु काही कारखानदार आणि मुकादम रात्री चोरट्या मार्गाने ऊसतोड कामगारांना घेऊन जात आहेत, यामुळे या ऊसतोड कामगारांच्या गाड्या ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने मोहन जाधव विनंती करून वापस पाठवत आहे. आणि जोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कारखानदार व काही मुकादमांनी संप फोडण्याचा प्रयत्न करू नये नसतात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
    शासन जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत कामगार कारखान्यावर जाणार नाही, ऊसतोडणी कामगारांना मागील पाच वर्षातल्या अंतरिम वाढीसह तोडणीदर ४०० रुपये करुन वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. उसतोड कामगारांच्या विम्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, दरवाढीचा करार दर तीन वर्षानीच करण्यात यावा. स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी अन्यथा एकही  उसतोडणी कामगार कारखाण्यावर जाणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा अशा मागण्या सीटू ऊसतोड कामगार संघटनेने मांडल्या. या आंदोलनात आबा राठोड, विनायक चव्हाण, विजय राठोड, भाई दत्ता प्रभाळे, अनिल राठोड, साहेबराव जाधव, बंडु राठोड, संतोष जाधव, रामराव राठोड, शिवाजी जाधव, बाळू राठोड आदी उपस्थित होते.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like