बीड न.प.ने बिंदुसरेची केली कचराकुंडी

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- बीड शहरातून जाणार्‍या बिंदुसरा नदी पात्रात नगरपालिकेने जागोजागी कचरा टाकून नदी प्रदूषित केली आहे. मोंढा रोड येथील पुलाजवळ तर न.प.ने बिंदुसरेत अधिकच जागा घेतल्यासारखेच ढिगारेचे ढिगारे टाकून ती कचराकुंडीच केली आहे. त्यामुळे नदीपात्र अरुंद होत चालले आहे. तर परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. 
     बीड नगरपालिका शहरातील कचरा आठ-आठ दहा - दहा दिवस उचलत नाही. कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर त्या कचरा कुंड्या उचलल्या जातात मात्र तो कचरा बिंदुसरा नदीपात्रात फेकला जातो. त्यामुळे नगरपालिकेने अनाधिकृतपणे बिंदुसरेला कचराकुंडीच करून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिका नदीपात्रातच शहरातील कचरा टाकत आहे त्यामुळे नदीपात्र दुषित झाले आहे.  पालिकेच्या आशिर्वादाने भुमाफियांनी नदीपात्रात अतिक्रमण केल्याने पात्रही अरुंद झाले आहे.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like