जिल्ह्यात ७ दिवसात ३८ कोरोना बाधितांचा मृत्यू

eReporter Web Team

बरे होण्याचा दर ८४.९१ तर मृत्यूदर ३.१६ 
बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग सुरुच असून शंभरपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत असतानाच कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ३४३ कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा होतो तो आज ३८१ वर जावून पोहचल्याने गेल्या सात दिवसात तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड होत आहे. सध्या मृत्यूदर हा ३.१६ एवढा वाढल्याचे दिसून येते. 
   बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा रोज शंभरपेक्षा अधिक रुग्णांनी रोज वाढताना दिसून येत असून आजपावेत जिल्ह्यात १२ हजार ७४ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १० हजार २५२ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये १ हजार ४४१ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४.९१ आहे तर मृत्युदर हा ३.१६ एवढा आहे. गेल्या १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा ४४३ एवढा होता तो आज ३८१ वर जावून पोहचला असून गेल्या सात दिवसाच्या कालखंडात तब्बल ३८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आजपर्यंत बीड तालुक्यात ९०, आष्टीत २५, पाटोदा २०, शिरूर ८, गेवराई २६,  माजलगाव २९, वडवणी ७, धारूर २४, केज ३१, अंबाजोगाई ६८, तर परळी तालुक्यात ५३ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like