बीड शहरासह तालुक्यात संसर्ग वाढला  आजच्या अहवालात बीडचे तब्बल ४५ पॉझिटिव्ह

eReporter Web Team

आज ८३ जणांनी केली कोरोनावर मात
बीड (रिपोर्टर)- गेल्या आठवड्यात कोरोनाचा दर घटला होता. मात्र या आठवड्यात कोरोनाने मुसंडी मारली असून शंभरच्या पुढे पॉझिटिव्ह रुग्णांची रोज भर पडत आहे. आजही ११७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्या तुलनेत केवळ ८३ जणांनी आज कोरोनावर मात केली. 
   सध्या सर्व काही खुले असल्याने कोरोना संपला की काय असे समजून नागरिक घराबाहेर पडत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. मास्क, सॅनिटायझर याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्यामुळे या आठवड्यात पुन्हा संसर्ग वाढला आहे. आज आरोग्य विभागाला ७०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमध्ये ५७९ जण निगेटिव्ह आले असून तब्बल ११७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये अंबाजोगाई १६, आष्टी २, बीड ४५, धारूर ९, गेवराई ७, केज ९, माजलगाव ३, परळी ९, पाटोदा ६, शिरूर ५ तर वडवणी तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहेत. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like