हमी भावापेक्षा कमी दराने माल खरेदी  केल्यास शेतकर्‍यांनी तक्रार करावी

eReporter Web Team

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
कापसाला 
५८२५ चा भाव 
तर सोयाबीनला 
३ हजार ८८० 
बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने २०२०-२१ या सालासाठी जाहीर केलेल्या पीकनिहाय किमान आधारभूत किंमतीपेक्षा जर कमी दराने शेतमाल खरेदी केला तर त्याची तक्रार जिल्हा अधिनिबंधक यांच्याकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शेतकर्‍यांना केले आहे. 
   केंद्र सरकारने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या पीकनिहाय किमान आधारभूत किमती दिल्या असून त्या किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणे पणन कायदा कलम ३४ आणि ९४ ड नुसार गुन्हा आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. भात-धान्य १८८६ प्रति क्विंटल, भात -धान्य (ए ग्रेट) १८८८, ज्वारी २६२०, ज्वारी मालदांडी २६४०, बाजरी २१५०, नाचणी ३२९५, मका १८५०, मुग ७१९६, उडीद ६०००, भुईमुग ५२७५, सुर्यफुल ५८८५, सोयाबीन ३८८०, तीळ ६८५५, काराळे, ६६९५, कपाशी मध्यम धागा ५५१५, कपाशी लांब धागा ५८२५, ऊस २८५० असे भाव केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like