राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौर्‍यावर

eReporter Web Team

मुंबई (रिपोर्टर)- या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे भेट देतील.गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौर्‍यावर असणार आहेत. १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.
      दरम्यान या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे भेट देतील. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.    शरद पवार यांनी यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. या दौर्‍याचा आढावा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. यानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौर्‍यानंतर राज्य सरकारकडून शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई मिळते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like