गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.   
   शंकर बाजीराव साबळे (वय २२, रा. मालकाचीवाडी ता. शिरूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री त्याने अज्ञात कारणावरून स्वत:च्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. याची माहिती सकाळी ग्रामस्थांना झाल्यानंतर शिरूर पोलिसांना सांगण्यात आले.  मार्गदर्शनाखाली पो.ना. मुंडे, एएसआय सानप, पो.ना.नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like