चोरट्यांची कमाल! चिल्लर ठेवली नोटा पळविल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर तीन ठिकाणी चोर्‍या

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निवासस्थानाच्या बाजुला व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या समोर तीन ठिकाणी रात्री चोरीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी शिवराज पान सेंटरचे कुलूप तोडून आतील नगदी १५ हजार रुपये चोरून नेले. आश्‍चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी टपरीतील नोटा चोरून नेल्या मात्र अडीच ते तीन हजाराची चिल्लर तशीच ठेवली. टपरीतील नगदी रकमेसह काही साहित्य चोरून नेले. त्यानंतर बाजुचे मेडिकलही फोडले. त्यातीलही काही नगदी रक्कम पळविली. याच बाजुला असलेल्या एका हॉटेलचे कुलूप तोडले मात्र त्यातून काही चोरीला गेले नाही. 
   धांडे यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर शिवराज पानसेंटर आहे. या टपरीचे रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आतील नगदी १५ हजार रुपये चोरून नेले. त्याचबरोबर दहा हजाराचा मालही चोरून नेला. विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी नगदी रक्कम पळविली मात्र आतील अडीच ते तीन हजार रुपयांची चिल्लर तशीच ठेवली. याच बाजुला असलेल्या झिया मेडिकलचे कुलूप तोडून आतील ४५० रुपये चोरून नेले. ही मेडिकल सावंत यांची आहे. त्यानंतर युवराज हॉटेलचे कुलूप तोडले हॉटेलमधील साहित्य मात्र चोरीला गेले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक निवासस्थानाच्या बाजुला आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या समोर या चोरीच्या घटना घडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्याम्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like