खळवट लिमगांव घटनेतील तिघांचे मृतदेह सापडले

eReporter Web Team

प्रशासन होते तळ ठोकून, तालुक्यात हळहळ

वडवणी (रिपोर्टर): माजलगांव धरणात छोट्या बोटीने प्रवास करत आसताना बोट पलाटी होऊन पाच जण बुडाले यात दोन जण बचावले आहेत.तर तीन जण बुडाले होते.यात बुडाल्यापैकी रात्री अकरा वाजता दोघांचा तर आज दुपारी साडे बारा वाजता एकाचा मृतदेह सापडला असुन प्रशासनाच्या मदत शोध मोहिमेला यश मिळाले आहे.तर या घटनेन तालुक्यासह जिल्हा सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
    या बाबत आधिक माहिती अशी कि,काल माजलगांव धरणात छोट्या बोटीने संयाकाळी पाच वाजता घरी परताना अचानक बोट पलटी होऊन एकाच घरातील पाच जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती.यामध्ये भारत राजेभाऊ फरताडे व त्यांच्या सासु अंतिका इंद्रजीत नाईकवाडे यांना पोहवयास येत असल्याने त्यांना सुखरुप काढण्यात आले मात्र पत्नी सुशिला भारत फरताडे वय-२७,मुलगा आर्यन भारत फरताडे वय-७ वर्ष या माय-लेकराचा रात्री अकरा वाजता मदत शोध मोहिमेत मृतदेह सापडून आला तर भाच्ची असणारी चिमकुली पुजा राजेभाऊ काळे वय-८ रा.माली पारगांव हिचा घटना घडल्यानंतर मृतदेह आढळून न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह नागरिक जिवाची परिकाष्ठा करत होते.रात्रभर मदत कार्य सुरु ठेवले तरी पण मृतदेह आढळून येत नसल्याने आज सकाळी मदत शोध मोहीम जलद व्हावी म्हणुन बीड येथील जिल्हा आपत्ती विभागाच्या एका पथकाला पाचारण करुन शोध मोहिमेला सुरुवात केली आणि आज साडे बारा वाजण्याच्या सुमारास पुजा काळे हिचा मृतदेह आढळून आला असुन एकच हबरडा ऐकविण्यास आला आहे.तर घटनेने तालुकासह जिल्हा सुन्न पडला असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून तिन ही मृतदेह श्वविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी याठिकाणी आणण्यात आले आहेत.अशी माहिती वडवणीचे तहसिलदार श्रीकांत सांगळे यांनी दिली आहे.

फरताळे कुटुंबियास २० लाखांची आर्थिक मदत द्या -भाई शेख राजू
पाण्यातून जीवघेणा प्रवास करत असताना तिघा जणांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला असून शासनाने त्यांच्या कुटुंबियास २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेकापचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई शेख राजू यांनी केली. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like