2094 जणांची कोरोना तपासणी, 77 पॉझिटिव्ह

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- दोन हजारापेक्षा अधिक संशयितांच्या तपासण्या केल्यानंतर
आज केवळ 77 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे समाधान
व्यक्त केलं जात आहे. 2094 संशयितांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठविण्यात
आले होते.
   बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 12 हजार 643 पर्यंत गेला असून
आजपावेत 10 हजार 907 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कालपर्यंत 407
जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत काल
जिल्ह्यातून 2094 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
यामध्ये 2 हजार 17 जणांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला तर 77 जणांचा रिपोर्ट
हा पॉझिटिव्ह आला. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 3, आष्टी 5, बीड 21,
धारूर 3, गेवराई 19, केज 4, माजलगाव 6, परळी 7, पाटोदा 2, शिरूर 3 तर
वडवणी तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like