
शहागड (रिपोर्टर)- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून राखी दहाच्या
दरम्यान औरंगाबादकडे कु्रझर गाडीमधून जात असलेल्या हिरा नावाच्या
गुटख्यासह गाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन 1 लाख 45 हजार रुपयांचा गुटखा
जप्त केला. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
कर्नाटक पासिंगच्या क्रुझर गाडीतून हिरा नावाचा गुटखा
बेकायदेशीररित्या औरंगाबाद येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती गोंदी
पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड यांना झाली. त्यांनी आपल्या
सहकार्यांसह रात्री शहागड पुलाच्या पुढे ही गाडी अडवली. गाडीची झाडाझडती
घेतली असता त्यात 1 लाख 45 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. गाडीसह सात
लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या
विरोधात भा.दं.वि. 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास
पोलिस करत आहेत.
अधिक माहिती: beed