फडणवीस, पंकजा मुंडेंनी घोषीत केलेली वाढ मजुरांना अद्याप मिळाली नाही तडजोडीसाठी शरद पवारांसह आदी नेत्यांना आमंत्रण द्या-प्रा.मोराळे

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- ऊसतोड मजुरांच्या प्रश्‍नासाठी विविध संघटनांनी संप
पुकारलेला आहे. आतापर्यंत साखर संघाबरोबर चार वेळा बैठका झाल्या मात्र
यात कसल्याही प्रकारे तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत तोडगा निघत नाही
तोपर्यंत मजुरांना हाती कोयता घेऊ देणार नाही, असा इशारा देत पाचवी बैठक
ज्या वेळेस होणार आहे त्या बैठकीला राष्ट्रवादीचे खा. शरद पवार,
शिक्षणमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री यांना आमंत्रित करावे. माजी
मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 टक्के आणि गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात
पंकजा मुंडे यांनी पाच टक्के दराची घोषणा केली होती. ही रक्कम ऊसतोड
मजुरांना अद्यापही मिळाली नसल्याची माहिती प्रा. सुशिला मोराळे यांनी
दिली.
   ऊसतोड मजुरांच्या आंदोलनासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार
परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार
परिषदेला मोहन जाधव, दादासाहेब मुंडे, संजय तांदळे यांच्यासह आदींची
उपस्थिती होती. पुढे बोलताना सुशिला मोराळे म्हणाल्या की, आतापर्यंत साखर
संघासोबत चार वेळा बैठका झालेल्या आहेत. या बैठकीत वाढीव मजुरीबाबत ठोस
निर्णय झाला नसल्याने संप सुरुच आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत
मजुरांना हाती कोयता घेऊ देणार नाही, तोडगा न निघाल्यास आंदोलन आणी तीव्र
करू, असा इशारा मोराळे यांनी दिला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस
यांनी ऊसतोड मजुरांना 20 टक्के व गेल्यावर्षी दसर्‍या मेळाव्यात पंकजा
मुंडे यांनी 5 टक्के वाढीव मजुरी देण्याची घोषणा केली होती मात्र याचे
अद्याप काहीच झाले. ही रक्कम अद्याप मजुरांना भेटली नसल्याचे मोराळे
यांनी सांगितले. पाचवी बैठक ज्या वेळेस होणार आहे त्या बैठकीला
राष्ट्रवादीचे खा. शरद पवार, शिक्षणमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री या
सर्वांना आमंत्रित करावे जेणेकरून या बैठकीमध्ये काही तरी तोडगा निघू
शकेल, असे प्रा. मोराळे यांनी सांगितले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like