कवडगावच्या पुलासाठी निमगावचे ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयावर काढला अर्धनग्न मोर्चा

eReporter Web Team


पुल नसल्यामुळे तिघांचा झाला पाण्यात बुडून मृत्यू
वडवणी (रिपोर्टर)- कवडगाव रस्त्यावरील देव नदीवर पुल नसल्याने
गावकर्‍यांना चप्पुचा आधार घेत नदी पार करावी लागते. परवा नदी पार करताना
चप्पु पलटी होऊन एका महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झाला. या प्रकरणी
गावकर्‍यात प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत असून आज पुलाच्या
मागणीसाठी गावकर्‍यांनी वडवणी तहसीलवर अर्धनग्न मोर्चा काढला होता.
   खळवट निमगाव येथील एक कुटुंब कापूस वेचून घरी परतत होतं. नदीतून
प्रवास असल्याने चप्पुचा आधार घेतला होता मात्र चप्पु पलटी झाल्याने
माय-लेकासह एका मुलीचा मृत्यू झाला. केवळ कवडगाव रस्त्यावरील या देवनदीवर
पुल नसल्यामुळे ही घटना घडली. पुलाची गेल्य अनेक वर्षांपासून मागणी होत
आहे मात्र शासन याची दखल घेत नाही. शासनाच्या निषेधार्थ आज खळवट
निमगावच्या गावकर्‍यांनी वडवणी तहसीलवर अर्धनग्न मोर्चा काढला होता.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like