एकदा शिवाजीपार्क वर मेळावा भरवायचं; पंकजा मुंडे यांचा निर्धार

eReporter Web Team
  •  

एकदा शिवाजी पार्क भरवायचं; पंकजा मुंडे यांचा निर्धार

ऑनलाईन रिपोर्टर 

भाजपाच्या  नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावातील भगवान गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर निशाणा साधला. मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा अपप्रचार करण्यात आला. पण मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन,” असा इशारा पंकजा मुंडेनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्थुती केली अन एकदा शिवाजीपार्क भरवायचा निर्धार केला 

भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,”तुम्ही धीर सोडू नका. कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही., पक्षाचा विचार मोठा असतो, पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, त्यांचं नाव पक्षातलेच नाही तर विरोधपक्षातले लोकंही घेतात,” असं त्यांनी सांगितलं.

“मी कुठल्याही कर्जातून मुक्त व्हायला तयार पण तुमचं कर्ज मला हवं आहे. हो मी तुमची कर्जदार आहे, तुम्ही देनदार आहात आणि मी कर्जदार, हे नातं असंच राहू द्या. ‘जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं’, मी कितीही धावायला तयार आहे, पण तुटालया तयार नाही,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

आपल्या आता अंत्योदय करायचा आहे. आता मंत्रालयाच्या चकरा मारु नका, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, त्याच्यापर्यंत मदत पोहोचवायचं काम करा. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे. यंदा आपला दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणं होऊ शकला नाही. यंदाचा मेळावा झाला ते जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण सर्व रेकॉर्ड तोडू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे. कधी स्वप्नातही भाजपाचं सरकार येईल असं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी भाजपाचं काम केलं. मित्रांसोबत बसलेले असताना ‘एक दिवस शिवाजी पार्क सभा घेणार. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतिर्थावर झाला. आज मी सांगतेय एक दिवस आपला हा मेळावा शिवतीर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.


अधिक माहिती: Beed

Related Posts you may like