अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा तो आरोपी निघाला पॉझिटिव्ह

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर): वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून दि.२७ मे २०१९ रोजी पळून नेले होते. या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमूख राणी सानप या करत होत्या. काल त्यांनी या आरोपींसह अल्पवयीन मुलीला पुणे येथून ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची ऍन्टीजन टेस्ट केली, यावेळी तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्या संपर्कात पाच ते सहा पोलीस कर्मचारी आले असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. 
वडवणी येथील आरोपी सत्यप्रेम वैजिनाथ आंधळे (वय २२) याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळून नेले होते. या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी महाळुंगे ता.खेड जि.पुणे येथून त्या आरोपीच्या मुस्न्या आवळत पिडीतेची सूटका केली. त्यानंतर आज आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. तेव्हा तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, पो.ह. पी.वाय.वाळके, म.प.ह.एस.सी. उगले, म.पो.ना. उगले, पो.शि.एस.एस. शेख, म.पो.शि. भोसले, पो.शि. बहिरवाळ, नेवडे यांनी केली. 
आज ८९ पॉझिटिव्ह 
आरोग्य विभागाला आज दुपारी १ हजार ८४ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ९९५ जण निगेटिव्ह तर ८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ११, आष्टी ११, बीड २३, धारूर ३, गेवराई ७, केज ६, माजलगाव ३, परळी ६, पाटोदा ४, शिरूर १०, तर वडवणीच्या पाच रुग्णांचा समावेश आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like