बर्दापूरमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबणा

eReporter Web Team

गावात तणाव, संताप, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक तळ ठोकून
बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर)- बर्दापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ बर्दापूर बंद करण्यात आले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून टायर जाळून रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी बर्दापूरला भेट दिली असून सध्या पोलिस अधीक्षक तळ ठोकून आहेत. विटंबणा प्रकरणी अज्ञात माथेफिरूंविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   बर्दापूर येथे असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबणा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बर्दापूर बंद करण्यात आले. घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेत या प्रकरणी अज्ञात माथेफिरुंविरोधात कलम १५३ ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या निषेधार्थ बर्दापूर येथे टायर जाळून निदर्शने करण्यात आली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक, डीवायएसपी गावात तळ ठोकून आहेत. 

नागरिकांनी शांतता राखावी 
-पोलिस अधीक्षक 

विटंबणा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी केले आहे. कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये व अफवाही पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like