महिलेच्या खून प्रकरणी दोघा जणांना घेतले ताब्यात

eReporter Web Team


केज (रिपोर्टर):- कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका 28 वर्षीय महिलेचा खून
केल्याचा प्रकार काल उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी केज तालुक्यामध्ये एकच
खळबळ उडाली. घटनास्थळी केज पोलीसासह एलसीबी दाखल झाली होती. या प्रकरणी
तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले असून
त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
साळेगाव येथील अश्‍विनी समाधान इंगळे (वय 28) ही महिला शुक्रवारी सकाळी
आपल्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेली होती. अज्ञात आरोपीने महिलेच्या
स्कार्पने गळा आवळून दगडाने मारहाण करत तिचा खून केला. सदरील हा मृतदेह
आढळून आल्यानंतर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलीस
प्रशासनाला झाल्यानंतर डिवायएसपी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रदिप
त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे, फौजदार सिद्धे,
पो.काँ.नामदास गायकवाड, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे पथक, अंकारे, जमील
शेख या ठिकाणी दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी वेगाने
लावण्यास सुरूवात केली असून यात दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात
घेतलेल्या युवकांचे वय 22 आणि 28 असे आहे. या दोघांची सखोल चौकशी सुरू
आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like