
पाटोदा ( रिपोर्टर )- पाटोदा नगर पंचायतची निवडणूक मुदत दिनांक २६/१२६२०२० ला संपत असुन पुढील सार्वत्रिक निवडणूक २०२० ची प्रभाग निहाय आरक्षण आज निवडणूक अधिकारी प्रकाश आघाव उपजिल्हाधिकारी,हरिश्चंद्र गरड नगरपंचायत सि. ई. ओ.,सुनिल ढाकणे नायब तहसिलदार व किरण देशमुख शाखा अभियंता नगरपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तहसिलला जाहीर करण्यात आहे.
पाटोदा नगरपंचायतची निवडणूक २०१५ ला झाली होती तिची मुदत दिनांक २६/११/२०२० ला संपत असुन पुढील निवडणूक कार्यक्रमासाठी प्रथम वार्ड रचना करण्यात आली असुन आज तहसीलमध्ये प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असुन प्रभाग क्रमांक १ हा अनुसुचित जाती,प्रभाग क्रमांक २ हा सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक ३ हा ना.मा.प्र.( ओ.बी.सी. ) ,प्रभाग क्रमांक ४ हा सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक ५ हा अनुसुचित जाती महीला,प्रभाग क्रमांक ६ हा सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक ७ हा ना.मा.प्र. ( ओ.बी.सी.),प्रभाग क्रमांक ८ हा सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक ९ हा सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक १० हा सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक ११ हा ना.मा.प्र. ( ओ.बी.सी.महीला ),प्रभाग क्रमांक १२ हा ना.मा.प्र. ( ओ.बी.सी.महीला ),प्रभाग क्रमांक १३ हा सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक १४ हा सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक १५ हा सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक १६ हा ना.मा.प्र. ( ओ.बी.सी.महीला ) व प्रभाग क्रमांक १७ हा सर्वसाधारण आरक्षीत झाला आहे.
शिरूर नगर पंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
शिरूर कासार : नगरपंचायत निवडणूक आरक्षण सोडत आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात .उप विभागीय अधिकारी टिळेकर यांच्या अध्यक्षेते खाली पार पडली यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे, नायब तहसीलदार किशोर सानप,नायब तहसीलदार अंजली गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले.एका लहान मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढून प्रभाग आरक्षण काढले. वार्ड ०१ (सर्वसाधारण महिला), वार्ड ०२ (सर्वसाधारण पुरुष ), वार्ड ०३ (सर्वसाधारण पुरुष), वार्ड ०४ (ओबीसी महिला), वार्ड ०५ (सर्वसाधारण महिला), वार्ड ०६ (सर्व साधारण पुरुष ), वार्ड ०७ (सर्व साधारण महिला), वार्ड ०८ (सर्व साधारण महिला) वार्ड ०९ (महिला ओबीसी), वार्ड १० (अनुसूचितजाती जमाती महिला), वार्ड ११ (ओबीसी महिला), वार्ड १२ (सर्वसाधारण महिला), वार्ड १३ (ओबीसी पुरुष), वार्ड १४ (अनुसुचितजाती जमाती पुरुष), वार्ड १५ (ओबीसी पुरुष), वार्ड १६ (सर्वसाधारण पुरुष ), वार्ड १७ (सर्वसाधारण पुरुष )
आष्टी नगरपंचायतचे अंतिम आरक्षण जाहीर
आष्टी (रिपोर्टर) :-आष्टी नगरपंचायत वार्ड निहाय आरक्षण दि.१० रोजी तहसिलदार कार्यालयातील सभागृहात नगरपंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी आरक्षण सोडत जाहीर केले असून १७ सदस्य असणार आहेत. यामध्ये वार्ड १ अनुसूचित जाती महिला ( डउ), वार्ड २ सर्वसाधारण,वार्ड ३ नामाप्र ( जलल) ,वार्ड ४ सर्वसाधारण महिला,वार्ड ५ नामाप्र ( जलल),वार्ड ६ सर्वसाधारण महिला,वार्ड ७ सर्वसाधारण महिला,वार्ड ८ सर्वसाधारण,वार्ड ९ सर्वसाधारण,वार्ड १० सर्वसाधारण ,वार्ड ११ सर्वसाधारण महिला,वार्ड १२ नामाप्र ( जलल) महिला,वार्ड १३ नामाप्र ( जलल) महिला,वार्ड १४ सर्वसाधारण,वार्ड १५ सर्वसाधारण महिला, वार्ड १६ नामाप्र ( जलल) महिला,वार्ड १७ वार्ड १ अनुसूचित जाती महिला ( डउ), याप्रमाणे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
अधिक माहिती: beed reporter