मोबाईल शॉपी फोडणार्‍या चोरट्याला ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर):- येथील बसस्थानकासमोर परवा दिवशी एक मोबाईल शॉपी फोडून त्यामधील आठ महागडे मोबाईल लंपास केले होते. याचा शोध स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी २४ तासात लावून सर्व मुद्देमालासह आरोपी जेरबंद केला. 
उत्तम पद्माकर घरात (वय २५) रा.साडेगाव ता.अंबड जि.जालना याने गेवराई शहरातील बसस्थानकासमोरील एक मोबाईल शॉपी रात्री फोडून त्यामधील महागडे आठ मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने केला. काल त्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचे गेवराई शहरातूनच मुसक्या आवळळ्या. यावेळी त्याने चोरलेले आठही मोबाईल पोलीसांनी हस्तगत केले आहे. सदरील कार्यवाही पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक, डीवायएसपी, स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भास्कर नवले, हे.कॉं.तुळशीराम जगतपा, पो.ना.मनोज वाघ, पो.ना.विकास वाघमारे, पो.ना.राहुल शिंदे, सायबर सेलचे पो.ना.विक्की सुरवसे यांनी केली. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like