‘पोपट’ पिंजर्‍यात

eReporter Web Team

‘पोपट’ पिंजर्‍यात

पत्रकारीता कशी असावी आणि कशी नसावी याचे काही नियम आहेत. आजच्या तंत्रज्ञ व आधुनिकतेच्या युगात पत्रकारीता वेगळ्याच स्वरुपात दिसू लागली. पत्रकार झाला म्हणजे तो जगाचा ‘मालकच’ झाला असा काहींचा तोरा असतो. उथावळपणाची पत्रकारीता समाजाभिमुख नसते. तो एक बालीशपणा आणि अहंभाव असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरुन पत्रकारीता करणं आणि कुणाची तरी विनाकारण बदनामी करणं हे काही चांगल्या पत्रकारीतेचं लक्षण नाही. चॉयनलच्या पत्रकारीते बाबत बोलावं तितकं कमीच आहे. चॉयनलचे पत्रकार स्वत:ला काय समजतात हे कळत नाही. पत्रकारीतेत वैचारीकपणा कमी आणि भडकपणाच जास्त झाला. पत्रकारीतेचा बेसच सत्याचा आणि न्याय मिळवून देण्याचा आहे. वंचीत घटकासाठी पत्रकारीता किती काम करते हा आज संशोधनाचा विषय आहे. अर्णब सारखे आणखी काही पत्रकार आहेत, ते आपल्याच रुबाब असतात. काही जण मोबाईल हाती घेवून कुठेही शुटींग करत असतात. फेसबुक चॉयनल आहे म्हणुन समाजात मिरवत असतात. याच्या माध्यमातून नको त्या भानगडी ते करत असतात. अशा पत्रकाराचा शहरी भागासह ग्रामीण भागात मोठा सुळसुळात सुरु आहे. अशांनी अर्णब प्रकरणातून काही तरी धडा घ्यायला हवा.

#पैसे मिळाले असते तर?

रिपब्लीकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे पुर्वीपासून ‘ओव्हार पत्रकार’ म्हणुन ओळखले जातात. त्यांची पत्रकारीता आगुचरपणाची आहे. त्यांच्या पत्रकारीतेबाबत नेहमीच प्रश्‍न आणि संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. पत्रकाराने पत्रकार आहे म्हणुन काहीही करायचं का? इतर व्यक्तीप्रमाणे त्याला ही कायद्याचे नियम असतील ना? पत्रकार झाला म्हणजे त्याला काही वेगळे अधिकार आहे का? अर्णब यांच्यामुळे २०१८ साली अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. तशी चिट्टी लिहून ठेवण्यात आलेली आहे. त्यावेळी अर्णब यांनी दबाव आणुन म्हणा किंवा इतर काही ‘अस्त्र’ वापरुन प्रकरण दाबलं असावं? त्यामुळे ते आज पर्यंत बचावले, मात्र कधी पर्यंत बचाव करणार? एवढं मोठं प्रकरण असतांना पत्रकारीतेच्या नावाने दडपलं जात असेल तर ही गंभीर बाब नाही का? काम करुन घ्यायचं आणि उलट पैसे द्यायचे नाही हा कुठला न्याय आहे. पैसे मिळत नसल्यामुळेच नाईक यांनी आपले जीवन संपवलेले आहे, नाईक यांना त्यांचे पैसे मिळाले असते तर त्यांना आपल्या जीवास मुकावे लागले नसते.

#त्यावेळी भाजपा का गप्प होता?

अर्णब यांचं हे प्रकरण भाजपाच्या कार्यकाळातील आहे. त्यावेळी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खुर्चीवर बसलेले होते. आज भाजपावाले इतका अर्णब यांचा पुळका दाखवत आहेत. याचा अर्थ काय आहे? अर्णब यांच्या बद्दल इतकं प्रेम भाजपवाल्यांना का उतू आलं? अर्णब यांची पत्रकारीता पुर्णंता भाजपाच्या बाजुने आहे म्हणुन तर हा सगळा कांगावा नाही ना? २०१८ चं प्रकरण असतांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं काम गृहमंत्री या नात्याने देेंवेंद्र फडणवीस यांची नव्हती का? पोलिसांना जर तपास लागत नव्हता तर सीबीआयकडे तपास द्यायचा? नको त्या घटनेचा तपास सीबीआयकडे, एसआयटीकडे दिला जातो, मग नाईक प्रकरणाची फाईल बंद करण्याची इतकी काय घाई झाली होती? ज्या प्रमाणे सुशांतच प्रकरण मोठा आंकडतांडव करुन गाजवलं, पण नाईक प्रकरणा बाबत भाजपा का तोंडबंद करुन होती. नाईक प्रकरणात तर दोघांच्या आत्महत्या आहेत. सुशांतच्या प्रकरणात कसली ही चिट्टी नाही. कुणावर आरोप नाही, तरीही भाजपाने हे प्रकरण तापवत ठेवलं, तसं नाईक प्रकरणाच नाही. त्यात चिट्टी आहे, कुणामुळे आत्महत्या करत आहे. याचा स्पष्ट उल्लेख आहे तरी तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री गप्प होते, याचा काय अर्थ आहे? आणि आज तेच व त्यांची भाजपा अर्णब यांची पाठराखण करत आहे म्हणजे नाईक व त्यांची त्यांच्या आईच्या मरणाचं भाजपावाल्यांना काहीच दु:ख नाही. कुणाला तरी वाचवण्यासाठी दोषीला पाठीशी घालायचं म्हणजे हे माणुसकीच्या विरोधातील द्रोह नाही का?

#अभिव्यक्तीची किती काळजी?

अर्णब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपावाल्यांना सुतकच पडलं? अटक होताच भाजपाचे कार्यकेर्ते हातात फलक घेवून रस्त्यावर उतरले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कसा गळा घोटला जात असल्याची ओरड होवू लागली. राज्यात आणीबाणी लागली का? असा सवाल भाजपावाले उपस्थित करु लागले आणि तसे पोस्टर्स राज्यात लावण्यात आले होते. काहींनी इंदिरा गांधी यांची आठवण करुन दिली. अर्णब यांना पत्रकारीतेच्या बाबतीत अटक झाली नाही हे आधी भाजपाने समजुन घेतलं पाहिजे. आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भाजपाला अभिव्यक्तीची इतकी काळजी आहे तर मग उत्तर प्रदेशमध्ये अनेक पत्रकारावर योगी यांनी गुन्हे कसे काय दाखल केले? त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात नव्हता का? हाथरसच्या प्रकरणात योगी सरकारच्या अधिकार्‍यांनी पत्रकारांना कशापध्दीतीची वागणुक दिली हे सगळ्यांनी पाहितलं. काही पत्रकारांवर देशद्रोहाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले हे पत्रकार फक्त हातरथला वृत्तसंकलानासाठी गेले होते, दंगल घडवण्यासाठी गेेले नव्हते तरी त्यांच्यावर गंभीर कलम लाववण्यात आले हे नियमात बसणारं आहे का? जेव्हा पासून केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आलं तेव्हा पासून किती पत्रकारांवर सुडबुध्दीतून कारवाई केली याचा विसर भाजपाला पडला का? काही पत्रकारांवर वृत्तसंकलावरुन तर काहींवर भाजपाच्या पोलखोल करणार्‍या बातम्या दाखवले किंवा छापल्या म्हणुन कारवाई करण्यात आली. तरी कुणाच्याही तोंडातून साधा ब्र शब्द निघत नाही. अर्णबच्या प्रकरणात भाजपाची अभिव्यक्ती कशी काय जागी झाली. कारण अर्णबचं चॉयनल भाजपाच्या बाजुने असते म्हणुन हा इतका पुळका का?

#कुणीच पाठीशी नाही

अर्णब यांना अटक झाल्यानंतर जो गदारोळ माजवण्याचा प्रयत्न भाजपावाल्यांनी केला तो नक्कीच शोभणारा नाही. पुरा देश अर्णब के साथ है अशा घोषणा देत तसे फलक भाजपावाल्यांनी फडकावले पण कुणालाच अर्णब यास अटक झाल्याचं दु:ख झालेलं नाही, फक्त भाजपा वगळता. अर्णब यांची पत्रकारीता समाजाच्या हिताची असते तर नक्कीच कोणी ना कोणी त्यांची बाजु घेतली असते. उलट अनेकांना अर्णबच्या अटकेचा आनंद झालेला आहे. आनंद याच्यामुळे झाला की, अर्णबने पत्रकारीता हा एक धंदाच बनवला आहे. आपल्या चॉयनलवरील चर्चा सत्रातील त्यांची भाषा असेल, किंवा एखाद्याची मुलाखत घेतांनाचे प्रश्‍न, बातम्या सांगतांना आरडाओरड, दुसर्‍यांना बोलू न देणे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या बद्दलची खालच्या पातळीवरची भाषा असेल, ही भाषा पाहता त्याचं कुणीच समर्थन करु शकत नाही. अर्णब यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल एकेरी भाषा आणि धमकीवजा बातम्या दाखवल्या असत्या तर हे भाजपावाल्यांना मान्य झालं असतं का? भाजपाच्या अभिव्यक्तीत हे बसतं का? संविधानीक पदावर बसलेल्या व्यक्तीचा आदर केलाच पाहिजे, पत्रकार झाले म्हणुन तुम्ही त्यांना वेशीवर टांगणार का? अर्णबच्या अटकेचा निषेध पत्रकारांनी करायला हवा होता. असं काहींची मत होतं, पण ही अटक पत्रकारीतेमुळे झालेली नाही. त्यामुळे पत्रकार संघटना यात पडल्या नाही. या अटकेचा आणि पत्रकारीतेचा काहीही संबंध नाही असं संघटनांनी घोषीत केले ते चांगलंच झालं. उगीच खोट्या गोष्टींना पाठबळ मिळत गेलं असतं तर तो एक चुकीचा संदेश गेला असता. अर्णब हे पत्रकार आहेत की, भाजपाचा ‘पोपट’ यातून दिसून येते? सत्याची बाजु धाडसाची असते. सत्य हे सत्यच असतं, ते कितीही लपून ठेवलं तरी ते लपून राहत नाही. अर्णब यांच्या पक्षात सत्य नाही म्हणुन त्यांच्या बाजुने आज कुणीच नाही. त्यांची बाजु सत्याची, न्यायाची असती तर नक्कीच त्यांच्या सोबत सगळे उभे राहिले असते. कारण पत्रकारीतेला मोठा इतिहास आहे. आज पर्यंतची पत्रकारीता ही समाजाला वाहिलेली आहे, पण अर्णब सारखे पत्रकार पत्रकारीतेला वेगळ्या दिशेला घेवून जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचे परिणाम असेच होत असतात हे ही लक्षात घ्यायला हवे.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like