महाआघाडीची घसरगुंडी, एनडीएची आघाडी

eReporter Web Team

एनडीए १२६ तर महागठबंधन १०२ जागांवर आघाडीवर, पासवान यांच्या पक्षाला २ जागा
दिल्ली (वृत्तसेवा)- अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वा.पासून सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसर्‍या फेरीमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये काट्याची टक्कर सुरू होती मात्र नंतरच्या फेरीमध्ये एनडीने आघाडी घेतली असून महाआघाडी पिछाडीवर पडली. सध्ये एनडीए १२६ जागांवर पुढे तर महाआघाडी १०२ जागांवर पुढे आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने मात्र म्हणावी तशी कामगारी केली नसल्याचे दिसून आले. अन्य छोट्या पक्षांचेही दुपारपर्यंत खाते उघडलेले नव्हते. 
   बिहार नेमकं कुणाकडं जातय याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून होतं. या निवडणुकीत भाजप आणि नितीशकुमार एकत्र आले होते तर कॉंग्रेस व राजदने महाआघाडी करून निवडणूक लढविली होती. एकूण २४३ जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाल्यानंतर आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसर्‍या फेरीमध्ये एनडीए आणि महाआघाडीत बरोबरीचा सामना सुरू होता मात्र त्यानंतरच्या फेर्‍यात एनडीने आघाडी घेतली आणि महाआघाडी पिछाडीवर पडली. दुपारी १ वाजेपर्यंत एनडीएचे १२६ उमेदवार आघाडीवर होते तर महागठबंधनचे १०२ उमेदवार पुढे होते. रामविलास पासवान यांच्या पक्षाची विशेष कामगारी या निवडणुकीत दिसून आली नाही. इतर पक्षांनीही या निवडणुकीत नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनाही यश आले नसल्याचे दुपारच्या निकालावरून स्पष्ट झाले. 

बिहारमध्ये जेडीयूला मागे टाकून 
भाजपा मोठा भाऊ बनण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये तीन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. प्रारंभी जे केले आले, त्यामध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए पुढे आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये बरेच अंतर आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने एकत्र निवडणूक लढवली असली, तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. हाच कल कायम राहिला तर बिहारमध्ये भाजपा मोठा भाऊ बनू शकतो. जेडीयूपेक्षा भाजपाचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. दोन्ही पक्षांनी निम्म्या जागा वाटून घेतल्या. भाजपाने १२१ जागा तर जेडीयूने १२२ जागा लढवल्या. हा कल असाच कायम राहिला तर प्रथमच बिहार एनडीएमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. २०१५ मध्ये भाजपा आणि जेडीयूने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. जेडीयूने कॉंग्रेस आणि राजदसोबत आघाडी करुन ७१ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला फक्त ५३ जागा जिंकता आल्या होत्या.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like