
गेवराई (रिपोर्टर):- गुजरातवरून कर्नाटककडे कारखान्याचा बारदाणा घेवून जाणार्या ट्रक चालकाचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगीच्या उड्डाणपुलावर ताबा सुटल्याने ट्रक कठड्यावर आदळून पलटला. यामध्ये जिवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे कठड्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
गुजरातवरून कर्नाटककडे ट्रक क्रमांक एम.एच.२० ईजी ९७०९ ने कारखान्याचा बारदाणा घेवून ट्रक चालक व किन्नर जात होते. यावेळी गेवराईवरून बीडकडे येतांना पाडळसिंगी उड्डाणपुलाच्या पाठीमागे ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक डिव्हाडरवर जावून आदळला. यामध्ये शंभर ते दोनशे मिटरपर्यंतचे लोखंडी डिव्हायडरचे नुकसान झाले असून ट्रक पलटी झाला आहे. यामध्ये बारदाणाही मोठा फाटला आहे. यात कोणीही जखमी झाले नाही.
अधिक माहिती: online beed reporter