मारहाणीनंतर  वृद्धाचा मृत्यू

eReporter Web Team

कळसंबरवडगाव येथील घटना
आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शेतीच्या बांधावरून झाली होती 
मारहाण 
नेकनूर (रिपोर्टर)- शेतीच्या बांधावरून एका ६५ वर्षीय वृद्धास मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर वृद्धाचा बीपी हाय झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन सदरील वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना कळसंबर वडगाव येथे घडली. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी लावून धरली होती. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. 
    रामचंद्र खामकर आणि सर्जेराव सिरसट यांच्यामध्ये शेतीच्या बांधावरून काल वाद निर्माण झाला होता. या वादातून सर्जेराव सिरसट यांना रामचंद्र खामकर व जनाबाई खामकर या दोघांनी मारहाण केली. मारहाणीनंतर सर्जेराव यांचा बीपी हाय झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत आरोपीविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यानुसार फिर्यादी सुभाष सर्जेराव सिरसट यांच्या फिर्यादीवरुन आरोपी रामचंद्र खामकर व जनाबाई खामकर यांच्याविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात कलम ३०४, ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलिस करत आहेत. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like