
‘ती’ मुलं फडात नाही तर चांगल्या शाळेत दिसतील
रोहीत पवारांच्या ट्विटवर मुंडेंनी दिला राज्यातील कामगारांच्या मुलांना विश्वास
बीड (रिपोर्टर)- ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबवावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरुपी उपाययोजना करत आहोत. ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिला. आ. रोहीत पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते.
आज सकाळी रोहित पवार यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये रोहीत पवार म्हणतात, माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबियांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे, असे म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंनी या ट्विटची दखल घेत ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबवावे व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या दृष्टीने स्व. गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने कायमस्वरुपी उपाययोजना करत आहोत, ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
अधिक माहिती: online beed reporter